Korpana : तालुक्यातील इंजापूर येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी रामदास मडावी (वय ६५,रा. इंजापूर,ता.कोरपना)याच्याविरुद्ध गडचांदूर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारी राहतो.५ जुलै २०२६ रोजी रात्री पीडितेच्या घरी वीज नसल्याचा फायदा घेत आरोपीने कुलर असल्याचे सांगून तिला आपल्या घरी नेले.रात्रीच्या सुमारास तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.तसेच,याबाबत कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान,१२ ऑक्टोबर रोजी मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.वैद्यकीय तपासणीत ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत(POCSO Act)गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली,गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.सदर प्रकरणी पुढील तपास सपोनि.एस.पी.गोदे,हे करीत आहेत.
#Shocking News. #POCSO Act. #POCSO - Protection of Children from Sexual OffencesvAct,2012. #Gadchandur Crime.

