Korpana : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव(दादा) भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कोरपना,येथील शेतकरी संघटनेचे नेते सुनील बावणे आणि आदिवासी समाजाचे नेते उत्तम गेडाम,यांनी भारतीय जनता पार्टीत(भाजप)जाहीर प्रवेश केला.या पक्षप्रवेशामुळे कोरपना तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून,शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आमदार देवरावदादा भोंगळे,यांच्या नेतृत्वात कोरपना तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर सुनील बावणे आणि उत्तम गेडाम,यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी आ.भोंगळे यांनी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे सन्मानपुर्वक स्वागत केले.
'भाजपमधील ‘इन्कमिंग’ सुरूच; पुढे आणखी कोण?' :
भाजपमध्ये पक्षप्रवेशांची मालिका सुरूच असल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… आगे-आगे देखो होता है क्या!’ अशी उपहासात्मक प्रतिक्रिया भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.त्यामुळे आगामी काळात आणखी कोणते राजकीय नेते भाजपमध्ये प्रवेश करणार,याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
'भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती' :
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे,शहराध्यक्ष अमोल आसेकर,नगरसेवक सुभाष हरबडे,ओम पवार,अरूण मडावी,किशोर बावणे,धनराज सरपंच,अबरार अली,सत्यवान घोटेकर,पुंडलिक उलमाले,पवन बुरेवार,संतोष बोरडे,अभय डोहे,मोबीन बेग,सुनील देरकर,प्रमोद गिटकर, विनोद कुमरे,उमेश कोल्हे आणि उमेश पालीवाल यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
'स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींची शक्यता' :
शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन परिसराच्या विकासासाठी काम करण्याची अपेक्षा,या पक्षप्रवेशातून व्यक्त होत आहे.सुनील बावणे आणि उत्तम गेडाम यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची स्थानिक संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होऊ शकते.आगामी काळात या पक्षप्रवेशाचा कोरपना तालुक्यातील राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होतो आणि भाजपमध्ये आणखी कोण प्रवेश करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
#MLA Deoraodada Bhongde #Korpana BJP #BJP News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢€€
