Chandrapur : पत्ते खेळण्यावरून झालेल्या वादातून लोखंडी सुरीने सपासप वार करून हत्या केल्याप्रकरणी राजुरा पोलिसांनी केलेल्या तपासानंतर न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.सदर निकाल २४ सप्टेंबर २०२६ रोजी मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय,चंद्रपूर येथे देण्यात आला.दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास बामणवाडा,ता.राजुरा येथे मृतकाने आरोपीस पत्ते खेळण्यासाठी दिले नाहीत,या कारणावरून आरोपीने पत्ते खेळत असलेल्या ठिकाणी पाणी टाकले.यामुळे दोघांमध्ये वाद झाला.या वादाचा राग मनात धरून आरोपीने लोखंडी सुरीने मृतकाच्या पोटात वार करून त्याची हत्या केली.
या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस ठाणे राजुरा येथे गुन्हा क्र.५००/२०२२,कलम ३०२ भादंवि तसेच कलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली.दरम्यान राजुरा पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब,वैद्यकीय अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले.तपास पूर्ण करून न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयाचा निकाल : सदर खटल्याची सुनावणी मा.ए.के. लाहोटी,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय,चंद्रपूर यांच्या न्यायालयात झाली.सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड.श्रीमती सीमा रामटेके व ॲड.श्री.पी.जी.घट्टवार यांनी केलेला युक्तिवाद तसेच सादर केलेले साक्षी-पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले.
त्यानुसार २४ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीस कलम ३०२ भादंवि अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा तसेच ₹५,००० दंड ठोठावला.दंडाची रक्कम न भरल्यास ३ महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
तपास व न्यायालयीन पैरवी : या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे,पोलीस स्टेशन राजुरा यांनी केला.
सरकारी अभियोक्ता : ॲड.श्रीमती सीमा रामटेके,ॲड.श्री.पी.जी. घट्टवार.
कोर्ट पैरवी अधिकारी : महिला पोलीस हवालदार ललिता शेंडे, ब.नं.१५५,पोलीस स्टेशन राजुरा.
दोषसिद्धी कक्ष चंद्रपूर : सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी,राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.
#Chandrapur District Crime News. #Rajura murder case.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
