Gadchandur : पोलीस ठाणे हद्दीत जुगार आणि सट्टापट्टी विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.घोडामगुडा येथील रस्त्यालगत एका शेतातील खुल्या शेडमध्ये ताशाच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या कारवाईत २,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर दुसऱ्या कारवाईत नांदफाटा ते पिंपळगाव मार्गावर सार्वजनिक ठिकाणी सट्टापट्टी खेळणाऱ्या एका इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्याच्याकडून १,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
'घोडामगुडा येथे जुगार अड्ड्यावर छापा' :
दि.६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस हवालदार दिवाकर पवार, पोलीस हवालदार विजय मुंडे आणि पोलीस अंमलदार नलबळे,हे प्रोव्हीजन व जुगारविरोधी कारवाईसाठी पेट्रोलिंगवर असताना, घोडामगुडा येथील एका शेतातील खुल्या शेडमध्ये काही इसम ५२ ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.यावेळी चार इसम ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळताना आढळले.त्यांच्या झडतीत रोख रक्कम आणि ५२ ताशांचे पत्ते,असा एकूण २,९०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.पंचनामा करून संबंधितांना ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ४९०/२६,कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'नांदफाटा-पिंपळगाव मार्गावर सट्टापट्टीविरोधात कारवाई' :
दि.७ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदफाटा ते पिंपळगाव मार्गावरील सार्वजनिक ठिकाणी सट्टापट्टीवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता,एक इसम सट्टापट्टी खेळताना आढळून आला.या कारवाईत १,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात अप.क्र. ४९१/२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सुरू आहे.
'वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई' :
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
#Gadchandur Crime News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
