Bike-truck Accident : राजुरा- बल्लारपूर मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू!| Marathi News.

News@Accident...

Gadchandur : राजुरा-बल्लारपूर मार्गावरील पुलाजवळ मंगळवारी(दि.१३ ऑक्टोबर)सायंकाळच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार आदर्श कैलास राठोड(वय २४,रा.बिबी-रामनगर,ता.कोरपना), याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून,बिबी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रेल्वे साइडिंगवर लोहखनिज खाली करून परतणारा ट्रक क्रमांक MH/33/T/3952,राजुरा-बल्लारपूर मार्गाने जात होता.दरम्यान,पुलाजवळ ट्रकची दुचाकी क्रमांक MH/34/AT/834 ला जोरदार धडक बसली.या धडकेत दुचाकीस्वार आदर्श राठोड गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमी आदर्शला तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान,अपघातामुळे राजुरा-बल्लारपूर मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.परिणामी,वाहतूक विस्कळीत होऊन वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.अवघ्या २४ वर्षांच्या आदर्शच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघाताची नोंद घेऊन राजुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

#Shocking News. #Bike-truck Accident.

                          ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢