Gadchandur Shocking News : रात्रभर कारमध्येच होता मृतदेह; गडचांदूर येथील खळबळजनक घटना!|Marathi News.

News@Shocking...

Gadchandur : गडचांदूर-थुटरा महामार्गावरील ‘राज बार अँड रेस्टॉरंट’समोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना मंगळवारी (दि.29 सप्टेंबर) सकाळी 10 च्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार,सदर कार सोमवार(दि.28 सप्टेंबर) दुपारी सुमारे 2 वाजल्यापासून बारसमोर उभी होती.बारच्या बांधकामावर काम करणाऱ्या एका कामगाराच्या निदर्शनास कारमध्ये एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसली होती.मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळीही कार त्याच ठिकाणी उभी असल्याने कामगाराने जवळ जाऊन पाहिले असता संबंधित व्यक्ती त्याच अवस्थेत आढळून आली.

याबाबत कामगाराने तत्काळ बार मालकाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.मृत व्यक्तीचे नाव सुनिल वरारकर (वय अंदाजे 42 वर्षे) रा.पाचगाव,ता.राजुरा,जि.चंद्रपूर असे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार,संबंधित व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र,शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.

#Gadchandur Shocking News #Chandrapur.

                   ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢€