Chandrapur : जिल्ह्यातील बहुचर्चित पापा जाधव हत्या प्रकरणात राजुरा पोलिसांना मोठे यश मिळाले असून,या प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अंकित बापुजी मासीरकर(वय २४,रा.चुनाळा,ता.राजुरा,जि. चंद्रपूर),असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास राजुरा येथील प्रदीप बारजवळ पापा जाधव यांची अग्निशस्त्राने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या घटनेप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात राजुरा पोलिसांनी गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केली होती.तपासादरम्यान या गुन्ह्यात संघटीत गुन्हेगारी टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA),१९९९ अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली.
यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी,राजुरा कुमार सुशांत यांनी हाती घेतला.गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे अंकित बापुजी मासीरकर याचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून,आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा कुमार सुशांत, पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार नितीन चिंचोळकर पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे (मकोका तपास पथक),अंमलदार सुरेंद्र काळे,दिनेश वैद्य,रवी तुराणकार,महेश बोलगोडवार आणि भूषण इटनकर यांच्या पथकाने केली.
#Rajura Crime News #Chandrapur #Rajura Police
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢€
