Chandrapur : जिल्ह्यातील मौजा पवनपार,ता.सिंदेवाही,येथे नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिडचा 'डीजे'मध्ये वापर करून आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी कारवाई केली आहे.दोन पंचांच्या समक्ष जप्ती पंचनामा करून डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकारिणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
याप्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात अपराध क्र.५७०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २२३,३(५)सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३८(१),१३६,७० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या कारवाईदरम्यान पोलिसांनी डीजे व इतर साहित्य तसेच वाहने असा एकूण १५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या ठाणेदार कांचन पांडे, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार,पोलीस अंमलदार संजय जुगनाके,नारायण येगेवार,शुभम उराडे,कमलेश फेंडर,सुनील बहेकार आणि नंदकिशोर तुमराम यांनी केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
#Chandrapur District Crime #DJ case #Police action against DJ.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
