Rajura : लॉयड्स मेटल राजुरा रेल्वे सायडिंग परिसरात उभ्या असलेल्या दोन ट्रकचे डिस्कसह १७ टायर चोरी करणाऱ्या दोघांना राजुरा पोलिसांनी मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातून अटक केली.रामलाल गिरधारी यादव (२७) आणि अजय श्रीकाशी पेटल (३०) अशी आरोपींची नावे आहेत.
चोरीच्या टायरची किंमत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये असून, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअपही पोलिसांनी जप्त केली. असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने ही कारवाई करण्यात आली.पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
#Rajura Crime News.

