Gadchandur Thanedar Transfer: गडचांदूरमधील कार्यकाळ अविस्मरणीय; ठाणेदार कदम यांचे भावनिक मत.नवे ठाणेदारापुढे आव्हानांची मालिका!|Marathi News.

News@Police...

Gadchandur : शहरातील नागरिकांचा मिळालेला सहकार्याचा हात आणि पोलीस प्रशासनावर दाखवलेला विश्वास हा आपल्या कार्यकाळातील कायम स्मरणात राहणारा अनुभव असून गडचांदूरमधील कार्यकाळ अविस्मरणीय असल्याचे भावनिक मत गडचांदूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार शिवाजी कदम यांनी व्यक्त केले.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी दिलेले सहकार्य मोलाचे ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

गडचांदूर पोलीस ठाण्यात आयोजित छोटेखानी निरोप समारंभात ते बोलत होते.ठाणेदार शिवाजी कदम हे मागील जवळपास अडीच वर्षांपासून गडचांदूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.या कालावधीत नागरिकांशी समन्वय राखत कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

दरम्यान,गडचांदूर पोलीस ठाण्यात प्रशासकीय फेरबदल झाला असून,ठाणेदार शिवाजी कदम यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी ब्रह्मपुरी येथून आलेले प्रमोद बानबले यांनी ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारला आहे.२ ऑक्टोंबर रोजी त्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली.

शिवाजी कदम यांच्या कार्यकाळात गडचांदूर शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्या सोबतच नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्यात आले. विविध गुन्हे व प्रकरणांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज करत पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यांच्या बदलीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण वातावरणात त्यांना निरोप दिला.                       'नव्या ठाणेदारांसमोर आव्हानांची मालिका.'

गडचांदूरची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवनियुक्त ठाणेदार प्रमोद बानबले,यांच्यासमोर शहरासह परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याचे आव्हान असणार आहे.विशेषतः अवैध दारूविक्री,जुगार,सट्टा,गोवंश तस्करी,गांजा विक्री तसेच इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ठोस आणि प्रभावी कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या तक्रारींची तत्परतेने दखल,गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि पोलीस-नागरिक समन्वय,या बाबींवर नव्या ठाणेदारांची कार्यपद्धती कशी राहणार,याकडे आता गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,निरोपाच्या वेळी शिवाजी कदम यांनी गडचांदूरकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.त्यामुळे त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाला भावनिक निरोप मिळाला.

#Police Station Gadchandur. #Gadchandur Thanedar Transfer #Chandrapur District police.

                       ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢