Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB)पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली.या कारवाईत १० ब्रास रेतीसह १६ चाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण ४० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,वाहन मालकाचा शोध सुरू आहे.
दि.१० ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्या मार्गाने गौण खनिजांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने नाकाबंदी करून संबंधित वाहनावर कारवाई केली.
'४०.७० लाखांचा मुद्देमाल जप्त' :
या कारवाईदरम्यान महेंद्र कंपनीच्या १६ चाकी वाहन क्रमांक MH-40-CV-9333 ची किंमत अंदाजे ४० लाख रुपये,१० ब्रास रेतीची किंमत ६० हजार रुपये आणि एक जुना वापरता मोबाईल किंमत १० हजार रुपये,असा एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
'चालकाविरुद्ध गुन्हा; मालक पाहिजे आरोपी' :
या प्रकरणात वाहनचालक नविनकुमार महाबीर सिंग (वय ४०,रा. फुलूटोला तफरदे,ता. पुरैनी बाजार,जि.मधेपुरा,बिहार),याच्या विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणातील पाहिजे आरोपी म्हणून वाहनमालक वाहिद झबीर शेख (रा.उमरेड,ता.उमरेड,जि.नागपूर) याचे नाव नमूद करण्यात आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग राजुरा आणि चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
#Chandrapur District Crime News #Police action against illegal sand transportation.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
