Wife and 3 daughters murdered with cement black : “पत्नी आणि 3 मुलींची दगडाने ठेचून हत्या; वृद्ध वडिलांना चहा पाजून निर्दयी पती फरार!”| Marathi News.

News@Murder...

         Jaipur : राजस्थानच्या जयपूरमधून एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.करधनी परिसरात राहुल झा याने पत्नी गीता झा आणि तीन मुलींची दगडाने वार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.विशेष म्हणजे,हत्या केल्यानंतरही आरोपीने कोणताही संशय येऊ नये, अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे वर्तन केले.दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपल्या वृद्ध वडिलांसाठी चहा बनवून स्वतःच्या हाताने त्यांना चहा पाजला आणि त्यानंतर घरातून फरार झाला.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता या हत्याकांडाची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता पहिल्या मजल्यावरील एका खोलीत गीता झा यांचा मृतदेह आढळून आला.तर दाम्पत्याच्या तीन मुलींपैकी २३ वर्षीय नंदिनी,१८ वर्षीय राधिका आणि १४ वर्षीय मुलीचे मृतदेह तळमजल्यावरील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळले.

झोपेत असतानाच हल्ला केल्याचा संशय? :

            घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेला दगड मिळाला आहे.चौघीही गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.मात्र,हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हत्येनंतर वडिलांना पाजला चहा :

      हत्याकांडानंतर राहुल झा याने अत्यंत सामान्य पद्धतीने वर्तन केल्याचे तपासात समोर आले आहे.सकाळी सुमारे ७ वाजता तो दूध घेण्यासाठी घराबाहेर गेला.त्यानंतर घरी परतून त्याने आपल्या वृद्ध वडिलांसाठी चहा बनवला.लक्ष्मीनाथ यांना त्याने स्वतःच्या हाताने चहा पाजला आणि त्यानंतर घरातून निघून गेला.पुढे त्याने पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.

    दरम्यान,आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून,त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तपास सुरू आहे.

आर्थिक अडचणींचाही तपास :

राहुल झा शेअर ट्रेडिंगचे काम करत होता.घटनेच्या काही दिवसां पूर्वीच तो गुजरातहून जयपूरला परतला होता.त्याची पत्नी गीता घराच्या पहिल्या मजल्यावर बुटीक चालवत होती.तर मोठी मुलगी नंदिनी शिक्षणासोबत एका खासगी कंपनीत नोकरी करत होती.

    पोलिसांच्या प्राथमिक तपासात राहुलने हत्येच्या अवघ्या तीन दिवस आधी शेजाऱ्याकडून २५ हजार रुपये उधार घेतल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आर्थिक अडचणी हा हत्याकांडामागील संभाव्य कारणांपैकी एक असू शकतो,असा पोलिसांचा संशय आहे.

    यासोबतच कुटुंबातील वादाच्या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत.चौघींची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली.या घटनेमागे आर्थिक कारण होते की कौटुंबिक वाद,तसेच या हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे का,याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

             दरम्यान,फरार आरोपी राहुल झा याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास आणि शोधमोहीम सुरू आहे.

#Crime News‌ #Wife and 3 daughters murdered with cement black.

                              ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢