𝐌𝐋𝐀 𝐃𝐞𝐨𝐫𝐚𝐨 𝐁𝐡𝐨𝐧𝐠𝐥𝐞 : भाजपमध्ये 'इन्कमिंग’ सुरूच; तळागाळातील कार्यकर्ताच पक्षाची खरी ऊर्जा — आ. देवराव भोंगळे.|Marathi News.

News@BJP...

Korpana : भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून विचार आणि कार्यकर्त्यांचे कुटुंब आहे.पक्षाची खरी ताकद तळागाळात अहोरात्र राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. निष्ठावंत आणि परिश्रम घेणारा तळागाळातील कार्यकर्ताच भाजपची खरी ऊर्जा आहे,असे प्रतिपादन राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव(दादा)भोंगळे यांनी केले.कोरपना तालुक्यातील वडगाव येथे २ ऑक्टोबर रोजी आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ.भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे आ.भोंगळे यांनी भाजपचा दुपट्टा घालून स्वागत केले.आ.भोंगळे पुढे म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना गती मिळाली आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. पक्षाची सर्वसमावेशक धोरणे आणि विकासकामांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा भाजपवरील विश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

यांनी केला भाजपमध्ये प्रवेश :

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये साहिल पाचभाई,प्रफुल जीवतोडे,प्रशांत मालेकर,आशिष गोहोकर,वैभव आंबेकर,श्रीराम पाचभाई,नरेश राजुरकर,प्रकाश भोंगळे,कार्तिक भोंगळे,श्रीकांत पाचभाई,प्रदीप आंबेकर,ज्ञानेश्वर वडस्कर,सुरज नांदे,विठ्ठल जांभेकर,वैभव गोहोकर,मारोती उरकुडे,नंदकिशोर भोंगळे,गजानन भोंगळे,शशिकांत देवाळकर,भास्कर निखाडे, चंद्रकांत कोलांडे,पांडुरंग मडावी,सतीश भोंगळे,घनश्याम भोंगळे, गोविंदा भोंगळे,विनोद गोहोकर,महेंद्र गोहोकर,चेतन आंबेकर, एकनाथ पाचभाई,विठ्ठल निंदेकर आणि मारोती भोंगळे यांचा समावेश आहे.नवप्रवेशित कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया :

राजुरा विधानसभा मतदारसंघात आ.देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती मिळाली आहे.सर्वांना सोबत घेऊन सन्मानाची वागणूक देत सुरू असलेली विकासकामे लक्षात घेऊन आपण विकासाच्या भूमिकेतून भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

कार्यक्रमाला भाजप कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे,पालगावचे सरपंच अरुण रागीट, निमणीचे सरपंच अतुल धोटे,पद्माकर मडावी,अशोक झाडे, निखिल भोंगळे,रवी बंडीवार,आशिष ताजने,अरुण गोहोकर, रामदास जोगी,रामदास पारखी,श्रीकृष्ण डवरे,शंकर पिंगे,प्रशांत पाचभाई,प्रफुल जीवतोडे,मुकेश निमकर,सचिन आस्वले,विशाल अहिरकर,शैला गोहोकर यांच्यासह भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#𝐌𝐋𝐀 𝐃𝐞𝐨𝐫𝐚𝐨 𝐁𝐡𝐨𝐧𝐠𝐥𝐞 #BJP News #Rajura Vidhansabha.

                           ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢