Gadchandur : शहरातील काही वीज ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त रकमेची बिले येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद डोहे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गडचांदूर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन वीज ग्राहक विठ्ठल धांडे यांना येत असलेल्या एवरेज(सरासरी)बिल व इतर समस्यांवर चर्चा केली.शिष्टमंडळात डोहे यांच्यासह यावेळी शाकीर भाई,रमेश चुदरी,बबलू रासेकर,जयंता भोंगळे,विठ्ठल धांडे, गणपत बुरटकर,विवेक भेडोलकर आदींची उपस्थिती होती.
ग्राहकांनी वाढीव वीजबिल,मीटर रीडिंग आणि बिलातील नोंदीं बाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.सध्या सुरू असलेल्या वीज मीटरमध्ये दोष असल्याचे सांगून नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचा मार्ग तर मोकळा केला जात नाही ना? अशी शंकाही शिष्टमंडळाने व्यक्त केली.
शिष्टमंडळाच्या प्रमुख मागण्या :
१. वाढीव वीजबिलांची तातडीने तपासणी करावी.
ज्या ग्राहकांना त्यांच्या नेहमीच्या वापराच्या तुलनेत अधिक रकमेची बिले आली आहेत,त्या बिलांची महावितरणने स्वतंत्रपणे तपासणी करावी.
२. प्रत्यक्ष मीटर रीडिंग आणि बिलातील रीडिंग तपासावे.
ग्राहकांच्या घरातील मीटरवर असलेले प्रत्यक्ष रीडिंग आणि बिलावर नमूद केलेले रीडिंग यांची पडताळणी करून तफावत असल्यास ती दूर करावी.
३. मीटर फॉल्टी असल्यास तांत्रिक तपासणी करावी.
एखादा मीटर सदोष असल्याचे महावितरणचे म्हणणे असल्यास त्याची अधिकृत तांत्रिक तपासणी करून ग्राहकांना त्याबाबत स्पष्ट माहिती द्यावी.
४. स्मार्ट मीटरबाबत पारदर्शकता ठेवावी.
जुना मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची आवश्यकता असल्यास त्यामागील कारण,नियम आणि प्रक्रिया ग्राहकांना स्पष्ट करण्यात यावी.केवळ मीटर फॉल्टी असल्याचे सांगून ग्राहकांवर कोणतीही प्रक्रिया लादू नये,अशी शिष्टमंडळाची भूमिका आहे.
५. चुकीचे बिल आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी.
तपासणीत बिलिंगमध्ये चूक किंवा रीडिंगमध्ये तफावत आढळल्यास संबंधित ग्राहकांचे बिल तातडीने दुरुस्त करून अतिरिक्त आकारणीचा प्रश्न निकाली काढावा.
६. ग्राहकांच्या तक्रारींसाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी.
वाढीव बिलांच्या तक्रारींसाठी ग्राहकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत,यासाठी महावितरणने तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था करावी,अशी मागणीही करण्यात आली.
‘शंका’ आणि ‘तथ्य’ वेगळे :
सध्या सुरू असलेल्या मीटरमध्ये दोष असल्याचे सांगून स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.मात्र,संबंधित मीटर फॉल्टी आहेत किंवा स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय याच कारणासाठी घेतला जात आहे,हे अधिकृत तपासणी अथवा महावितरणच्या स्पष्टीकरणाशिवाय निश्चित झालेले नाही.
त्यामुळे महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी करून वाढीव बिलांचे कारण,मिटरची स्थिती आणि स्मार्ट मीटर बसविण्याची आवश्यकता याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे.
#Gadchandur Mahavitaran Electricity #Electricity Bill Case.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
