Korpana : ग्रामीण भागातील “शेतकरी,कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी भारतीय जनता पक्ष(BJP) नेहमीच कटिबद्ध असून,लोकसेवा हाच पक्षाचा मुख्य ध्यास आहे” असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी केले.ते ३ ऑक्टोबर रोजी कोरपना येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यायात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते.

आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कोरपना येथील शेतकरी संघटनेचे माजी नगरसेवक सुभाष तुराणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी आ.भोंगळे यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजपाचे दुपट्टे घालून स्वागत केले.
यावेळी बोलताना आ.भोंगळे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकासकामांना गती मिळाली आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.भाजपाची सर्वसमावेशक धोरणे आणि विकास कामांमुळे सर्वसामान्य नागरिक पक्षावर विश्वास व्यक्त करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
'या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.' :
या पक्षप्रवेश कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे माजी नगरसेवक सुभाष तुराणकर,नगरसेविका आशा झाडे,अजय झाडे,अभिषेक तुराणकर,ईश्वर तुराणकर आणि गणेश तुराणकर यांनी भाजपात प्रवेश केला.आ.देवरावदादा भोंगळे यांचे नेतृत्व आणि विकास कामांवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याची भावना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
'भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.' :
या कार्यक्रमाला भाजपचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर,तालुका महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, नगरसेवक किशोर बावणे,अरुण मडावी,आशिष ताजने,अबरार अली,पवन बुरेवार,धम्मकीर्ती कापसे,उमेश कोल्हे,सत्यवान घोटेकर,पुंडलिक उलमाले,सुनील बावणे,उत्तम गेडाम,संतोष बोर्डे,तिरुपती कन्नाके,अभय डोहे,राहूल ठावरी,प्रदीप पिंपळशेंडे, वर्षा लांडगे,यांच्यासह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#Korpana BJP News #Joined the Bharatiya Janta Party #MLA Deoraodada Bhongde.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
