Gadchandur : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी शुक्रवार,दि.१६ ऑक्टोबर रोजी गडचांदूर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रचार पत्रके व मतदार याद्यांचे वाटप करण्यात आले.प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत प्रत्यक्ष पोहोचून उमेदवाराला प्रथम पसंतीचे मत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत,तसेच आपापल्या मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान घडवून आणावे,असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी केले.यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना उत्साहाने प्रचारात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
'बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती' :
या बैठकीला गडचांदूर भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे,भाजप तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट)राजुरा विधानसभा प्रमुख शरद जोगी, शहराध्यक्ष करण बुऱ्हाणी,भाजप शहर महामंत्री सतीश बेतावार, भाजप शहर युवा अध्यक्ष विक्की उरकुडे,नगरसेवक सुरेश मेश्राम भाजप शहर उपाध्यक्ष रमेश चुदरी,शहर चिटणीस जयंता भोंगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव गोरे,सदू गिरी,भाजपचे शाकीर भाई यांच्यासह महायुती व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Graduates Constituency Election. #Gadchandur.

