Korpana : आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजुरा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून,लखमापूर येथील शेतकरी संघटनेचे नेते मोरेश्वर आस्वले तसेच निमणी येथील सरपंच अतुल धोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.या पक्ष प्रवेशामुळे शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.लखमापूर येथे आयोजित भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव (दादा)भोंगळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजपचे दुपट्टे घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना आ.भोंगळे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय सत्ता मिळविणारा पक्ष नसून तळागाळातील सामान्य नागरिक,शेतकरी,कष्टकरी आणि तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत कार्य करणारा पक्ष आहे.पक्षाची धोरणे सर्वसमावेशक विकासाला गती देणारी असून,लोकहिताचे कार्य करणारा प्रमुख पक्ष म्हणून भाजपा काम करीत आहे.” देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती मिळत असल्याचे सांगत आ.भोंगळे यांनी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हे भाजपचे प्रमुख ध्येय असल्याचे नमूद केले.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
विकासकामांना प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश :
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली राजुरा विधानसभा मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामांमुळे आणि त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती :
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे,तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद डोहे,पालगावचे सरपंच अरुण रागीट,राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य विशाल गजलवार,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण मडावी,भाजयुमो तालुकाध्यक्ष दिनेश खडसे, प्रफुल कावळे,नगरसेवक सतीश बेतावार,हिमांशु नामवाड, नगरसेविका संगीता गावत्रे,कीर्ती वैरागडे,नम्रता डुकरे, कवठाळाच्या सरपंचा रुपाली बोबडे,नंदा पाटेकर,अशोक झाडे, नांदा भाजप शहराध्यक्ष संजय नीत,रवी बंडीवार,प्रमोद कोडापे, श्रीकृष्ण गोरे,विशाल पावडे,नरसिंग हामने,संजय थिपे,ज्ञानेश्वर पानघाटे,आबाजी बोबडे,अविनाश वाभिटकर,सचिन बोंडे,राजू डाखरे,पुरुषोत्तम निब्रड,समशेर शेख,प्रदीप पारखी,निलेश भिवापुरे,अनिल संकुलवार,सुरेश चौधरी,शंकर उरकुडे,दिलीप काकडे,रविंद्र वडस्कर,सुरेश बुऱ्हान,शंकर शेंडे,रवींद्र नांदे,मारोती पांढरे,नामदेव येडमे,भाऊराव जुमनाके यांच्यासह इतर भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान,मोरेश्वर आस्वले,अतुल धोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#Bharatiya Janata Party. #Political Explosion. #MLA Devraodada Bhongle.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

