Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तेलंगणा राज्यातून वाहतूक करून आणलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला.या कारवाईत एकूण १ लाख २३ हजार ३७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'ताब्यात घेतलेले आरोपी' :
१) साहिल मंगल वांढे (वय २४),रा. बिनबागेट वॉर्ड, चंद्रपूर.
२) वसंत नागोजी नरड (वय ६०),रा.हनुमान वॉर्ड,चंद्रपूर.
'मुद्देमाल जप्त' :
कारवाईदरम्यान हुक्का शिशा,ईगल हुक्का शिशा आदी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांसह गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची MH-34-AR-9909 क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली.जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख २३ हजार ३७५ रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
'वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई' :
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर उपविभाग पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
#Flavored Tobacco #Action by LCB Chandrapur #Crime News.

