Rajura : शहरातील जवाहरनगर परिसरातून मोपेड चोरी करणाऱ्या आरोपीला राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.दीपक मारोती उमरे(वय 38,रा.माता मंदिर वॉर्ड, राजुरा,जि.चंद्रपूर),असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून,त्याच्याकडून चोरीस गेलेली हिरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड,किंमत अंदाजे(एक लाख)जप्त करण्यात आली आहे
'घरासमोर उभी असलेली मोपेड चोरीला' :
जवाहरनगर,राजुरा येथील गोविंदा मदत झाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,10 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11 वाजल्यापासून 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या घरासमोर उभी असलेली हिरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड (क्र.MH/34/BA/3464),अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.या मोपेडची किं.अं.एक लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
'गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक' :
चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली.गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दीपक उमरे याला जवाहरनगर परिसरातून ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेली मोपेड जप्त करण्यात आली.
'वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई' :
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनात,पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या कारवाईत सपोनि.लक्ष्मण लोकरे,सफौ.किशोर तुमराम,पोहवा. संजय चौधरी,विक्की निर्वाण,अनुप डांगे,पोअं.शफीक शेख, मिलिंद जांभुळे,रमेश बस्सी,गुडेराव पोले आणि राजीव दुबे यांनी सहभाग घेतला.
#Chandrapur District Crime News #Bike thief.

