Chandrapur : बल्लारपूर शहरातील बुद्धनगर वॉर्डातील गौसिया मशीद परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या अनस खान (वय १८) या तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ताब्यात घेतले.त्याच्याकडून अंदाजे ५०० रुपये किमतीची ७९ सेंटीमीटर लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त सुरू असताना धारदार शस्त्र घेऊन एक तरुण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.सदर ठिकाणी पोहोचताच पोलिसांना पाहून तरुणाने तलवार फेकून दिली.पोलिसांनी तलवार जप्त करून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला.
पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार पुरुषोत्तम चिकाटे,पोलीस अंमलदार फुलचंद लोधी आणि शांतकुमार घोसे यांनी ही कारवाई केली.
#Chandrapur District Crimr News #Ballarpur Police.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
