Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने २ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्लारशाह बायपास रोडवर कारवाई केली.एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
मरपल्ली गणेश गौंड व्यंकटेश गौंड (वय २५), रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशाह, जि.चंद्रपूर,असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) अंतर्गत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूसह मित्सुबिशी पजेरो (Mitsubishi Pajero) जप्त करण्यात आली आहे.या कारवाईत ‘रॉकेट संत्रा’ कंपनीची ९० एमएलच्या ५०० नग देशी दारूच्या बाटल्या, किंमत २० हजार रुपये, तसेच पांढऱ्या रंगाची मित्सुबिशी पजेरो चारचाकी (क्र.AP/28/BW/0828), किंमत ५ लाख रुपये,असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग चंद्रपूर पथकाने केली.
#Chandrapur District Crime News #Mitsubishi Pajero #Ballarpur.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
