Crime News : देशी दारूच्या 48 पेट्यांसह पिकअप वाहन जप्त; चालक फरार!|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पोंभुर्णा हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या महेंद्र पिकअप वाहनावर पोलिसांनी कारवाई करत 9 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईदरम्यान वाहनचालक वाहन सोडून फरार झाला.

दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करीत असताना चेक नवेगाव रस्त्यावरून एका वाहनातून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे सपोनि.पाटील व पोलीस पथकाने संबंधित वाहनाचा पाठलाग केला.

पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन वेगाने चालवले आणि चेक नवेगावजवळ रस्त्याच्या कडेला अचानक वाहन थांबवून ते सोडून पळ काढला.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू ‘रॉकेट संत्रा’च्या 48 पेट्या आढळून आल्या.याममध्ये प्रत्येकी 100 नग असून,दारूची अंदाजे किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे.तसेच महेंद्र पिकअप वाहन क्रं.MH-15-GV-4332,अंदाजे किंमत 7 लाख रुपये आहे.अशा प्रकारे एकूण 9 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत.याप्रकरणी संबंधित कलमान्वये पोंभुर्णा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

'वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई' :

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत सपोनि.राहुल ठेंगणे,पोउपनि.भूषण पाटील,एएसआय नैताम,एचसी हनुवते,पीसी अमलेश आणि डीपीसी रजत तसेच पोंभुर्णा पोलीस स्टेशनच्या पथकाने सहभाग घेतला.

#Chandrapur District Crime News.

               ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢