Chandrapur Crime : चंद्रपुरात अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन महिला ताब्यात; ३९ हजारांची दारू जप्त|Marathi News.

News@Crime...

           Chandrapur : नागपूरहून चंद्रपुरात अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सावरकर चौकात सापळा रचून ताब्यात घेतले.त्यांच्या कडून रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ३६ सीलबंद बाटल्या,एकूण किंमत ३९ हजार ९२४ रुपये,जप्त करण्यात आल्या.ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

सन्नो मनोज जाट (वय ५२)आणि लक्ष्मी सुरेंद्र जाट (वय ४०), दोघीही रा.केंजर मोहल्ला,जबलपूर (मध्य प्रदेश),अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.गणराज ट्रॅव्हल्स (क्र.MH-34-BZ-6748),मधून नागपूरकडून आलेल्या या महिलांच्या बॅगची पंचांसमक्ष झडती घेतली असता,त्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या प्रत्येकी ७५० मि.ली.क्षमतेच्या ३६ सीलबंद बाटल्या आढळून आल्या.

'चंद्रपुरातील प्रिन्स केंजरला विक्रीसाठी दारू आणल्याचा संशय.'

पोलिसांच्या माहितीनुसार,या महिला नागपूरहून विदेशी दारू आणून चंद्रपुरातील प्रिन्स केंजर याला विक्रीसाठी देणार होत्या.या प्रकरणात प्रिन्स केंजर,रा.केंजर मोहल्ला,चंद्रपूर,हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर उपविभागीय पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

#Chandrapur Crime. #Action by LCB Chandrapur.

                    ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢