Chandrapur Crime : एम.डी.ड्रग्जसह आरोपी जेरबंद; 42 हजारांचा मुद्देमाल जप्त! LCBची कारवाई;|Marathi News.

News@MD Drugs...

Chandrapur : अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात कारवाई करत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने स्थानिक रामाळा तलाव परिसरातून एका आरोपीला अटक केली.त्याच्या कडून एम.डी.(Mephedrone drugs)ड्रग्ज पावडर, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ४२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२१ ऑक्टोबर रोजी गस्ती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हनुमान मंदिरासमोरील एम.ई. सी.बी.कार्यालयाजवळ,जमनजेट्टी परिसरात सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एम.डी.ड्रग्ज पावडर आढळली.

'अटक आरोपी' : 

शानवाज़ उर्फ शानू इस्माईल शेख(वय २८),रा.अहमदिया मशीद जवळ,रामाळा तलाव चंद्रपूर.

पोलिसांनी ६.७३० ग्रॅम वजनाची (पिशवीसह)एम.डी.पावडर,जुना वापरता मोबाईल आणि रोख रक्कम,असा ४२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.प्राथमिक तपासात आरोपीने हा ड्रग्ज पावडर नागपूर येथून विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तस्करीतील इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCBचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

#Chandrapur Crime News #MD Drugs #Action by LCB Chandrapur.

                     ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢