Chandrapur Crime : जुगार अड्ड्यावर छापा;11 जण ताब्यात, 12,लाखांचा मुद्देमाल जप्त!| Marathi News.

News@Crime....

Chandrapur:रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई करत 11 जणांना रंगेहात पकडले.या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य,असा एकूण 12 लाख 6 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई 20 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 4.50 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी,अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे समतानगर, तुकूम परिसरात छापा टाकला.या कारवाईदरम्यान समतानगर, तुकूम येथील राजेंद्र सोमाजी रायपुरे यांच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत काही जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जुगार खेळणाऱ्या 11 जणांना ताब्यात घेतले.

शैलेश गंगाधर पोडल्लीवार वय 50(शिक्षक जिल्हा परिषद)रा. छत्रपती नगर चंद्रपुर,रंजू कालीदास दुर्योधन वय 54 कालीदास (ऑटो चालक)रा.वैद्यनगर,चंद्रपूर,इंद्रजीत सोमाजी रायपुरे वय 58,रा.तुकूम चंद्रपूर,राजेंद्र सोमाजी रायपुरे वय 53,रा.एसटी वर्कशॉप तुकुम चंद्रपुर,राजेश्वर पोचम दुर्गे वय 48(डब्ल्युसीएल)रा. भिवापूर वार्ड चंद्रपूर,लतीत उर्फ क्षितीज बाकाराम देशपांडे वय 48,रा.छत्रपती नगर तुकुम चंद्रपुर,अनिल यशवंत बनकर वय 65 वर्षे (रिटायर डब्ल्यूसीएल),रा.सिनाळ,जि.चंद्रपूर,किशोर वसंता पारखी वय 49(डब्ल्युसीएल),रा.इंदीरानगर चंद्रपूर,सुनिल रामचंद्र नगराळे वय 63(रिटायर डब्ल्यूसीएल,रा.एसबीआय तुकूम चंद्रपूर, संजु खुशाल दुर्योधन वय 38(डब्ल्युसीएल)रा.डब्ल्युसीएल कॉलनी शक्तीनगर दुर्गापुर,चंद्रपूर.विजय गजानन रायपुरे वय 55  (डब्ल्युसीएल)रा.समता कॉलनी तुकुम चंद्रपुर यांना जागीच पकडून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 12,6,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चव्हाण यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले,पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे तसेच पोलीस अंमलदार आनंद खरात,प्रकाश बलकी रामप्रसाद नेताम,बाबा नेताम,रविकुमार ढंगळे,जितेंद्र आकोरे, मनीषा मोरे,मंगेश शेंडे,पंकज ठोंबरे,प्रकाश मडावी,संदीप गेडाम, सुरेश कोरवार,पंकज पांदे,सुरज शेडमाके व ब्युटी सांखरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

अवैध जुगाराविरोधातील या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून,अशा अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

#Chandrapur Crime. #Gambling.

                 €€€€€€€€€€€€€€€€€€€€€€€€€€€