Cattle Smuggling News : गोवंश तस्करीवर गडचांदूर पोलिसांचा मोठा प्रहार; ३७ जनावरांची सुटका, २२.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त!|Marathi News.

News@Crime...

Gadchandur : गोवंश तस्करीविरोधात गडचांदूर पोलीस स्टेशन येथील डीबी पथकाने मोठी कारवाई करत ३७ गोवंश जनावरांची सुटका केली आहे.जनावरांची कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात वाहतूक केली जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी मौजा भोयगाव येथे नाकाबंदी केली.या कारवाई दरम्यान पोलिसांनी ३७ गोवंश जनावरे,वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक आणि मोबाईल असा एकूण २२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

'नाकाबंदी पाहून चालकाचा पळण्याचा प्रयत्न' :

गडचांदूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की,मौजा भोयगाव मार्गे कथ्थ्या रंगाच्या अशोक लेलँड ट्रकमधून (क्रमांक MH-34-AV-2312) गोवंश जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेण्यात येणार आहेत.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने भोयगाव येथे नाकाबंदी केली.

दरम्यान,चंद्रपूरच्या दिशेने भोयगाव मार्गे येणारा संबंधित ट्रक पोलिसांना दिसला.ट्रक थांबवण्याचा इशारा दिला असता, चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेले.पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला.गडचांदूर-कोरपना मार्गे तेलंगणाच्या दिशेने जात असताना मौजा पारडी येथे पोलिसांची नाकाबंदी पाहून चालकाने ट्रक दूरवर थांबवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

'२२.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त' :

पंचांसमक्ष ट्रकची तपासणी केली असता,त्यामध्ये एकूण ३७ गोवंश जनावरे (बैल व गायी) आढळून आली.या जनावरांची अंदाजे किंमत ७ लाख ४० हजार रुपये,ट्रकची किंमत १५ लाख रुपये,तर मोबाईलची किंमत एक हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.अशा प्रकारे एकूण २२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सुटका करण्यात आलेल्या जनावरांना पुढील देखभालीसाठी प्यार फाऊंडेशन,पडोली,चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.

'वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई' :

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली,गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, पोलीस हवालदार शितल बोरकर,नापोअं.शर्मा,पोअं.साईनाथ उपरे,सुरज ढोले,प्रकाश बाजगीर,मनोहर जाधव आणि सोडनर यांचा समावेश होता.

#Gadchandur Crime News #Cattle smuggling #Gadchandur Police 

                     ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢€