BJP Mahila Morcha : JNU प्रकरणाच्या निषेधार्थ राजुरात भाजप महिला मोर्चाचे आंदोलन; काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी!| Marathi News.

News@BJP Women's Wing...

राजुरा : JNU विद्यापीठातील प्राध्यापक आणि काँग्रेस खासदार यांच्या संबंधित ११ मुलींच्या कथित छेडछाडीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने(१२ आक्टोंबर) रोजी राजुरा येथे निषेध आंदोलन करण्यात आला.या आंदोलना दरम्यान भाजप महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.या निषेध आंदोलनात भाजपच्या प्रदेश महामंत्री कुमारी अल्का आत्राम,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी अरविंद डोहे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्षा आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.नारी के सम्मान मे,भाजपा मैदान मे :

‘जवाब दो,जवाब दो – राहुल गांधी जवाब दो!’, ‘प्रियंका गांधी जवाब दो!’, ‘सोनिया गांधी जवाब दो!’, ‘महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा धिक्कार असो!’, 'नारी के सम्मान मे,भाजपा मैदान मे',अशा गगनभेदी घोषणा देत आंदोलनकर्त्या महिलांनी आपला संताप व्यक्त केला.यावेळी काँग्रेसच्या कथित महिलाविरोधी धोरण आणि संबंधित प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी :

यावेळी बोलताना भाजप प्रदेश महिला महामंत्री कुमारी अल्का आत्राम आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी अ. डोहे यांनी संबंधित प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.काँग्रेस पक्षाकडून महिला सुरक्षेबाबत भूमिका मांडली जात असताना, पक्षाशी संबंधित व्यक्तींवर अशा प्रकारचे आरोप होणे,ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले.या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.तसेच कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.या निषेध आंदोलनातून महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत भाजप महिला मोर्चाने संबंधित प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.#BJP Mahila Morcha #Chandrapur District BJP #BJP Women's Wing.

                             ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢