Action against illegal country liquor : 1 लाखाची अवैध देशी दारू जप्त; LCB ची कारवाई|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB)पथकाने शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा वाठोडा येथे कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेली देशी दारू जप्त केली.या कारवाईत 1लाख रुपये किमतीच्या देशी दारूच्या 2,500 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या असून,दो आरोपींविरुद्ध शेगाव पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील आणखी एक आरोपी पाहिजे आहे.

'दोन आरोपींचा समावेश' :

या प्रकरणात निखिल शेखर जोंगोनी(वय 23,रा.खांबाडा,ता. वरोरा)आणि प्रवीण मारोतराव सुरसे(वय 32,रा.बारवा,ता.वरोरा) यांचा समावेश आहे.तर प्रशांत उर्फ परशु आत्राम(रा.वाठोडा,ता. वरोरा)हा पाहिजे आरोपी असून,त्याचा शोध सुरू आहे.

'1 लाखांचा मुद्देमाल जप्त' :

कारवाईदरम्यान 25 खर्ड्यांच्या खोक्यांमध्ये ठेवलेल्या 90 मिली क्षमतेच्या रॉकेट संत्रा ब्रँडच्या देशी दारूच्या एकूण 2,500 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 1 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

'वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई' :

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात वरोरा-चिमूर उपविभागीय पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

#Chandrapur District Crime #Action by LCB Chandrapur.

                     ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢