Chandrapur Crime News : गणेश विसर्जन बंदोबस्तात LCBची धडक कारवाई; तरुणाकडून सुरीसह फायटर जप्त!|Marathi News.

News@Crime...

         Chandrapur : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात बंदोबस्त व पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB)पथकाने स्थानिक गोलबाजार परिसरात कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले.त्याच्याकडून धारदार लोखंडी 'सुरी' आणि लोखंडी 'फायटर',असा मुद्देमाल जप्त केला.

       दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्त व पेट्रोलिंगवर असताना गोलबाजार परिसरात एक इसम हातात धारदार हत्यार बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

             मिळालेल्या माहितीच्या आधारे LCB पथकाने पंचांसमक्ष कारवाई करत आर्यन किशोर पचारे (वय 19 वर्षे,रा.जलनगर वॉर्ड, चंद्रपूर),याला ताब्यात घेतले.पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी सुरी (अंदाजे किंमत ₹200) आणि लोखंडी फायटर(अंदाजे किंमत ₹200)असा मुद्देमाल जप्त केला.

          या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम 4,25(1-B)(b) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी त्याला पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

        ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB पथकाने केली आहे.

#Chandrapur District Crime News. #Action by LCB Chandrapur.

                           ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢