Shocking News : भरधाव पिकअपने घेतला मेडिकल व्यावसायिकाचा बळी!|Marathi News.

News@Accident...

       Ballarpur : शहरात एका मद्यधुंद बोलेरो पिकअप चालकाने भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवत अक्षरशः तांडव घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या पिकअपने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका मेडिकल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यानंतर चालकाने पुढे जाऊन आणखी एका दुचाकीस्वाराला धडक देऊन जखमी केले आणि याच्या पुढे दहेली गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली.या घटनेत पिकअप चालकही जखमी झाल्याची माहिती आहे.या अपघातात 48 वर्षीय अरशद मुबारक खान रा.टीचर कॉलनी,बल्लारपूर,यांचा मृत्यू झाला.अरशद खान यांचे ‘बल्लारपूर मेडिकल’ नावाने मेडिकल स्टोअर्स आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,29 ऑगस्ट बुधवार रोजी रात्री सुमारे 9 ते 9.30 वाजताच्या दरम्यान अरशद खान,हे आपल्या ओला इलेक्ट्रिक मोपेड क्रमांक MH/34/CG/7786 वरून बल्लारपूरहून बामणी,येथील मेडिकल दुकानाकडे जात होते.दरम्यान,मेन रोडवरील व्यंकटेश अपार्टमेंटसमोर मागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप क्रमांक MH/32/Q/ 2595 ने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती कि,अरशद खान दूर फेकले गेले.त्यांच्या डोक्यावरील हेल्मेटही उडून गेला आणि ते गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी त्यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी दवाखान्यात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच त्यांचा मुलगा मोहसीन खान यांच्यासह कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले.

          या प्रकरणी मयत अरशद खानचे 22 वर्षीय सुपुत्र मोहसीन अरशद खान,यांनी दिलेल्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीसांनी ठाण्यात बोलेरो पिकअप चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS),2023 मधील कलम 105,125(a),125(b),281 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 व 185 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल दुधाराम राऊत,यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

#Ballarpur Road Accident News. #Shocking incident.

                                ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢