Mul - Chandrapur Highway Car-Truck Accident : कार अपघातात महिला पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू | Marathi News.

News@Shocking incident...

             Chandrapur : चंद्रपूर-मुल रोडवरील वलनी फाट्याजवळ सोमवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी अंदाजे 6.30 च्या दरम्यान ट्रक आणि स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात घडला.या अपघातात महिला पोलीस कर्मचारी विशाखा बन्सोड,यांचा जागीच मृत्यू झाला.उजळणी कोर्सच्या प्रशिक्षणासाठी स्वतःच्या कारने चंद्रपूरकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.या दुर्दैवी घटनेमुळे मूल शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस दलावरही शोककळा पसरली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार,विशाखा बन्सोड या सोमवारी सकाळी आपल्या स्विफ्ट कार क्रमांक 34/BR/2568 ने चंद्रपूर येथे आयोजित उजळणी कोर्सच्या प्रशिक्षणासाठी निघाल्या होत्या. दरम्यान,चंद्रपूर रोडवरील वलनी फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की,कारच मोठ्या प्रमाणात चेंदामेंदा झाला आणि या अपघातात विशाखा बन्सोड यांचा जागीच मृत्यू झाला.

       विशाखा यांची यापूर्वी सावली पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. नुकतीच त्यांची तळोधी(बाळापूर) येथे बदली झाली होती.बदली नंतर प्रशिक्षणाच्या निमित्ताने चंद्रपूरकडे जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय, सहकारी पोलीस कर्मचारी तसेच परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

       विशाखा या मूल शहरातील तेली मोहल्ला परिसरात रविकांत चिंतावार यांच्या घरी पतीसोबत भाड्याने राहत होत्या.त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने मूल परिसरात शोक व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहनांची पाहणी केली असून,पुढील तपास सुरू केला आहे.

#Chandrapur car-truck accident. #Car-Truck Accident. #Shocking incident.

                               ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢