Chandrapur Crime News : नाकाबंदीला न जुमानता ट्रक पळवला; पाठलागानंतर LCB च्या जाळ्यात,₹22.35 लाखांचा मुद्देमाल जप्त.| Marathi News.

News@Cattle smuggling...

   Chandrapur Crime : स्थानिक गुन्हे शाखा(LCB),चंद्रपूर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत भद्रावती परिसरात 35 गोवंशांची अवैध वाहतूक उधळून लावत तब्बल ₹22.35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी चालक व क्लिनर, अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

      पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.4 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन पडोली हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान,MH/31/CV/0817 क्रमांकाचा 10 चक्का टाटा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक न थांबवता भद्रावतीच्या दिशेने वेगाने पळ काढला.त्यानंतर LCB च्या पथकाने तत्काळ पाठलाग करून सब स्टेशन पावर ग्रिड,जुना सुमठाणा,भद्रावती येथे ट्रक ताब्यात घेतला.

दरम्यान ट्रकची तपासणी केली असता,त्यामध्ये 31 गायी व 4 बैल अशा एकूण 35 गोवंशांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.कारवाईदरम्यान चालक व क्लिनर यांना ताब्यात घेण्यात आले.तसेच 10 चक्का टाटा ट्रक,35 गोवंश आणि दोन मोबाईल हँडसेट,असा एकूण ₹22.35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

'ताब्यात घेण्यात आलेले आरोपी' :

भुषण ओमकार तरारे(वय 24),रा.आझादनगर,कामठी,नागपूर.

सैय्यद जसिन सैय्यद असलम(वय 33),रा.ताजबाग चौक,नागपूर.

'पाहिजे आरोपी' :

राकेशकुमार यावकराम टेकाम व मोसिन.

'जप्त मुद्देमाल' :

10 चक्का टाटा ट्रक(MH/31/CV/0817),₹15 लाख,35 गोवंश (31गायी व 4 बैल)₹7 लाख,2 मोबाईल हँडसेट ₹35 हजार, याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम,1960,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम,1976 तसेच बीएनएस,2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB उपविभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

#Chandrapur District Crime News #Action by LCB Chandrapur.

                        ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢