Bike thief arrested : चोरीची मोटारसायकल घेऊन फिरणारा संशयित कोरपना पोलिसांच्या ताब्यात.|Marathi News.

News@Crime...

Korpana : नाकाबंदी पाहताच संशयास्पदरीत्या दुचाकी वळवून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा कोरपना पोलिसांनी पाठलाग करून ताबा घेतला.त्याच्याकडील मोटारसायकल त्याने तेलंगणा राज्यातील आदिलाबाद,येथून चोरी केल्याचे तपासात उघड झाले.ICJS प्रणालीद्वारे तपासणी केली असता संशयिता विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात तब्बल पाच गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले.

प्राप्त माहितीनुसार,सदर आरोपी आदिलाबाद येथून चोरी केलेली दुचाकी घेऊन येत असताना कोरपना पोलिसांची नाकाबंदी पाहून दुचाकी वळवून पळण्याचा प्रयत्नात असताना कोरपना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.दरम्यान पोलिसांच्या चौकशीत सदर व्यक्तीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 5 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.मिलिंद डंवरे (वय 33,रा.लोणी,ता. कोरपना),असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याचे कळते.

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशानुसार  7 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत कोरपना पोलीस आपल्या हद्दीत गस्त आणि नाकाबंदी राबवित होते. यावेळी वनसडी टोल नाक्याजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या मोटारसायकलवरून येताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांची नाकाबंदी पाहताच त्याने अचानकपणे मोटारसायकल वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

     पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला थांबविले.चौकशी दरम्यान त्याने आपले नाव मिलिंद डवरे असल्याचे सांगितले. त्याच्याकडील TS-01-ER-0473 क्रमांकाच्या मोटारसायकल बाबत पोलिसांनी अधिक तपास केला.वाहनाच्या क्रमांकावरून आदिलाबाद पोलिसांशी संपर्क साधला असता,सदर मोटार सायकल आदिलाबाद बसस्थानकावरून चोरीस गेली असून याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.यानंतर संशयिताची माहिती ICJS प्रणालीद्वारे तपासण्यात आली. त्यावेळी मिलिंद डवंंरे याच्याविरुद्ध पांढरकवडा येथे 2,राजुरा येथे 2 आणि गडचांदूर येथे 1,असे एकूण 5 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

            कोरपना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यासोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.सदर व्यक्ती कोणताही वैध व्यवसाय करीत नसल्याचे तसेच त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे भविष्यात सार्वजनिक शांतता आणि नागरिकांच्या मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने,त्याच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 35(ब) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.जप्त केलेली मोटारसायकल पुढील कारवाईसाठी आदिलाबाद पोलीस स्टेशन टाऊन-2 येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

   सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली,कोरपना पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोहवा.नामदेव पवार आणि पोशि.लक्ष्मण नुनूंचे यांनी केली.

#Bike thief arrested #action by Korpana Police #Chandrapur.

             ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢