Gadchandur Police take Action Against Underage Bike Rider's : अल्पवयीन वाहनचालकांवर गडचांदूर पोलिसांची धडक कारवाई|Marathi News.

News@Underage Biker's....

            Gadchandur : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक,यांच्या निर्देशानुसार ७ ऑगस्ट रोजी गडचांदूर पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चालकां विरोधात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहेत.

या मोहिमेदरम्यान दुचाकी चालवित असलेल्या २१ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.संबंधित मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.प्रथमच नियमांचे उल्लंघन करताना आठळल्यामुळे प्रत्येकी ₹१,००० इतका दंड वसूल करण्यात आला यापुढे अल्पवयीन मुले पुन्हा दुचाकी चालवताना आढळल्यास संबंधित पालकांविरोधात किंवा वाहनमालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार थेट गुन्हा दाखल करण्यात येईल.असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.तसेच सर्व दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा,तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सपोनि.सुखदेव गोदे,सपोनि.गणेश अनबूडे यांच्या उपस्थितीत पोहवा.सुरेश बलकी पोअं.रामसिंग पवार,पोअं.विकास जाधव,पोअं.श्रीनिवास सोडणार यांनी केली आहे.

#Underage biker's Case.#Gadchandur police take action against underage bike riders. #Gadchandur #Chandrapur.

                        ¢¢¢¢¢¢€¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢