Cattle smuggling : नाकाबंदीला न जुमानता ट्रक भरधाव; पाठलागा नंतर 35 गोवंशांसह ₹22.01 लाखांचा मुद्देमाल जप्त|Marathi News.

News@Crime...

Gadchandur : पोलिसांनी धाडसी कारवाई करत नाकाबंदीला न जुमानता भरधाव वेगाने पळालेल्या ट्रकचा पाठलाग करून 35 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली.या कारवाईत ट्रक, मोबाईल आणि जनावरांसह एकूण ₹22.01 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी चालकाविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना 5 ऑगस्ट 2026 रोजी गुप्त माहिती मिळाली होती की,चंद्रपूर मार्गे भोयगाव–गडचांदूर मार्गाने एमएच-27 एक्स 8886 क्रमांकाच्या 12 चाकी टाटा ट्रकमधून गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी नेली जात आहेत.या माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी मौजा भोयगाव येथे नाकाबंदी केली.

6 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजता संशयित ट्रक नाकाबंदीच्या ठिकाणी आला.पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने आदेश धुडकावून लावत भरधाव वेगाने ट्रक तेलंगणा राज्याच्या दिशेने पळविला.पोलिसांनी तत्काळ सिनेस्टाईलने पाठलाग करून मौजा परसोडा फाटा,येथे ट्रक अडविले.मात्र,चालक ट्रक सोडून जंगलाच्या दिशेने फरार झाला.

पंचांसमक्ष ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 35 लहान-मोठे गोवंश जातीचे बैल आढळून आले.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये जनावरे (अंदाजे ₹7 लाख),ट्रक (₹15 लाख)आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाईल (₹1 हजार)असा एकूण ₹22,01 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या जनावरांना वैद्यकीय तपासणी, सुरक्षितता आणि चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्यार फाउंडेशन,चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 409/2026 नोंद करण्यात आला असून प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम,भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.

सदरची धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोउपनि.पंकज हेकाड,बलवंत शर्मा,साईनाथ उपरे,मनोहर जाधव सूरज ढोले,प्रकाश बाजगीर आणि राजरत्न बोरुडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

#Cattle smuggling #Action by Gadchandur Police.

                           ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢€