Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे.६ ऑगस्ट रोजी मूलच्या पोलीस पथकाने MIDC परिसरातील उमा नदी नाक्यावर सापळा रचून गोंदियातून अवैधरित्या आणला जात असलेला प्रतिबंधित सुगंधित व खुला तंबाखू साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो पिकअप वाहन जप्त केले आहे.या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत,एकूण ₹६ लाख,९९ हजार,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.Mul Police Seized Flavored Tobacco.
प्राप्त माहितीनुसार,मूल पोलीस स्टेशनचे पथक प्रोव्ही रेड व गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली की,बंदी असलेला सुगंधित व खुला तंबाखू एका बोलेरो पिकअपमधून गोंदिया जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या दिशेने आणला जात आहे.सदरच्या माहितीवरून पोलीसांनी तात्काळ उमा नदी नाक्यावर नाकेबंदी करून सापळा रचला.दरम्यान संशयित वाहन MIDC परिसरात पोहोचताच पोलिसांनी त्याला वेढा घालून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ₹३९,७५० किमतीचा ३० किलो होल हुक्का शिशा तंबाखू तसेच ₹१,६०,००० किमतीचा खुला तंबाखू,असा एकूण ₹१,९९, ७५० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेले ₹५ लाख किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH/35/AJ/3595 जप्त करण्यात आले.अशा प्रकारे एकूण ₹६ लाख,९९ हजार,७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.याप्रकरणी राहुल हिरालाल मल्लेवार (वय २६,रा.गोरेगाव,जि.गोंदिया),याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पंचांसमक्ष पंचनामा करून 'ई-साक्ष' ॲपद्वारे संपूर्ण कारवाईचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.जप्त मुद्देमाल आणि वाहन,मूल पोलीस स्टेशन येथे CCTV घ्या निगराणीत ठेवण्यात आले असून,पुढील कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन (FDA)चंद्रपूर यांना अधिकृत माहिती देण्यात आली.
सदरची धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मूलचे SDPO सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पार पडली.प्रत्यक्ष कारवाईत पोउपनि.रुपेश कुंभरे, पोहवा.पंकज बगडे आणि पोहवा.भास्कर कोवे,यांनी महत्त्वाची भूमीका बजावली.या कारवाईमुळे तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले असून,जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सतर्क आणि प्रभावी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
#Chandrapur District Crime. #Mul Police Seized Flavored Tobacco.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
