Action by LCB Chandrapur : शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक आरोपी अटकेत,इतर फरार.₹9.51 लाखांचा मुद्देमाल जप्त!|Marathi News.

News@Crime...

       Chandrapur :जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून शेतीसाहित्य व कृषी अवजारे चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चंद्रपूरच्या पथकाने अटक केली असून,त्याच्याकडून चोरीस गेलेले शेतीसाहित्य,कृषी अवजारे तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो अशी एकूण ₹ 9,51,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

         स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.14 जुलै रोजी कोसारा– पडोली मार्गावर नाकाबंदी करून शिवराज चिनकन वेलपुरी(वय 39),रा.राजीव गांधी नगर,आझाद चौक चंद्रपूर,याला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपीने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शेतीसाहित्य चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

       तपासात वरोरा,बल्लारपूर,गडचांदूर(दोन गुन्हे)आणि राजुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आले.आरोपीकडून ₹ 2,51,500 किमतीचे शेतीसाहित्य व कृषी अवजारे तसेच MH-34-CQ-1310 क्रमांकाची महिंद्रा बोलेरो (कि.₹ 7 लाख)जप्त करण्यात आली.अशाप्रकारे एकूण ₹ 9,51,500 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणात आकाश हरिदास बेले(रा.भद्रावती),राजू वीरशप्पा स्वामीशेट्टी(रा.गडचांदूर)आणि रवी दगडुजी गदाई(रा.इंदिरानगर चंद्रपूर),हे आरोपी अद्याप फरार असून,त्यांचा शोध सुरू आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात वरोरा व राजुरा उपविभागीय पथकाने संयुक्तरीत्या केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून जिल्ह्यात झालेल्या आणखी काही चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#Crime News. #Agri Theft Case.#LCB Chandrapur.#Marathi News.

                  $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$