Gadchandur : पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अंमली पदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाई करत गांजा व डोडा पावडर बाळगून विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.या कारवाईत ₹20,640 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस (NDPS)कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.15 जुलै 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत वार्ड क्रमांक 6,गडचांदूर येथे राहणारा विक्रमसिंग बहादुरसिंग भोंड(वय 42),हा आपल्या राहत्या घरी गांजा हा अंमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.या माहितीची वरिष्ठांना कल्पना देऊन पंचांसमक्ष कायदेशीररित्या घरझडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून 957 ग्रॅम गांजा(किंमत ₹19, 140)तसेच 279 ग्रॅम डोडा पावडर(किंमत ₹1,500)असा एकूण ₹20,640 किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे गुन्हा क्रमांक 391/2026 अन्वये कलम 8(क),20(ब)(ii)(A)व 15(a), NDPS कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पार पडली.
कारवाईत सपोनि.सुखदेव गोदे,पोउपनि.पंकज हेकाड,पोउपनि. गणेश अनभुले,मपोउपनि.राधिका गायकवाड,नापोअं.बलवंत शर्मा,पोअं.मनोहर जाधव,साईनाथ उपरे,सुरज ढोले,प्रकाश बाजगीर,दत्ता चव्हाण व मपोअं.सरिता येरगुडे यांनी सहभाग घेतला.
#Gadchandur Crime News. #NDPS Case.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
