Chandrapur : भद्रावती-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील घोडपेठ येथे रविवारी(दि.१९ जुलै)दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीमुळे(चुरी)दुचाकी घसरल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृतकाचे नाव अनिल सुधाकर बावणे(रा.शिवाजीनगर,भद्रावती) असे असून,ते आपल्या ॲक्टिवा(क्र.MH/34/CS/7875),या दुचाकीने भद्रावतीहून चंद्रपूरकडे ड्युटीवर जात होते.घोडपेठ परिसरात महामार्गावर पडलेल्या बारीक गिट्टीवरून दुचाकीचा ताबा सुटून वाहन घसरले.त्याचवेळी मागून येत असलेल्या ट्रक (क्र.RJ/17/CB/3519)खाली ते आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातातील धक्कादायक बाब म्हणजे अनिल बावणे यांनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र,अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की हेल्मेटचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.हेल्मेटचा वापर करूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही? यावरून अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह ग्रामीण रुग्णालय,भद्रावती येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
रस्त्यावर पडलेली बारीक गिट्टी हा अपघातास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून,याबाबत सखोल तपास सुरू आहे.संबंधित ट्रक,चालक तसेच अपघाताच्या सर्व परिस्थितीची चौकशी ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस करीत असून,पुढील तपास सुरू आहे.
#Horrific accident at Ghodpeth; Biker dies on the spot despite wearing helmet. #Chandrapur. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
