Bike Accident : गडचांदूर-नांदा रोडवर भीषण अपघात; दोन दुचाकींची समोरासमोर धडक,चौघे गंभीर जखमी. Marathi News.

News@Terrible Accident....

              Korpana : गडचांदूर-नांदा मार्गावर शनिवारी(दि.१८ जुलै) सकाळी जवळपास ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन चार जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली.या भीषण अपघातात चौघांच्याही उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून,गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.जखमींमध्ये विकास पटेल(वय अंदाजे २५),आशिष पटेल(वय आंदाजे २६),मुलमुल प्रसाद(वय अंदाजे ३५)आणि राजीक शेख(वय अंदाजे ४०)यांचा समावेश आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार,आशिष पटेल आणि विकास पटेल,हे बिबी येथे एका ठिकाणी जाऊन दुचाकीने गडचांदूरकडे परतत होते.त्याचवेळी राजीक शेख आणि मुलमून प्रसाद,हे काही कामानिमित्त गडचांदूरवरून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दिशेने दुचाकीने जात होते.गडचांदूर-नांदा मार्गावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

    धडक इतकी भीषण होती की,चारही जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे रेफर केले.

          'रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले.'

    गडचांदूर-नांदा मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची तक्रार वाहनचालक व नागरिकांकडून केली जात आहे.एका बाजूला रस्त्याची दुरवस्था तर दुसऱ्या बाजूचा रस्ता तुलनेने चांगला असल्याने अनेक वाहनचालक एकाच बाजूने वाहने चालवतात.त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचा धोका वाढत असून अपघातांना आमंत्रण मिळत आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत,अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांकडून होत असून अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.आता संबंधीत विभाग याकडे लक्ष देणार का? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे. 

#A terrible accident involving two bikes.#Gadchandur City News.#Marathi news.

                                  $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$