Korpana : वनसडी परिसरात अनेक वर्षांपासून बंद असलेला अवैध मटका व सट्टापट्टीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याचा आरोप करत तो तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे)तालुकाप्रमुख राकेश राठोड यांनी केली आहे.यासंदर्भात राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोरपना पोलीस स्टेशनमध्ये लेखी निवेदन सादर केले आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,वनसडी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या मटका व सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू असून,त्यामुळे परिसरातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे.अनेक वर्षांपासून बंद असलेला हा बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्यवसायामुळे तरुण पिढी जुगाराच्या विळख्यात अडकण्याचा धोका वाढला असून,अनेक गोरगरीब कुटुंबांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.त्यामुळे या अवैध धंद्याला तात्काळ आळा घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
राठोड यांनी इशारा देताना सांगितले की,पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.त्यामुळे आता वनसडी परिसरातील अवैध मटका व सट्टापट्टी प्रकरणी कोरपना पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#Korpana Taluka Crime News. #Korpana Taluka Shiv Sena(Shinde). #Chandrapur.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
