Chandrapur Police Launch Major Campaign Against Durga : तक्रारींसाठी विशेष हेल्पलाईन सुरू, माहिती देणाऱ्यांची ओळख राहणार गोपनीय! Marathi News.

News@Crime...

    Chandrapur : जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या(drugs)वाढत्या दुष्परिणामांना आळा घालून चंद्रपूर जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर पोलीस प्रशासनाने विशेष जनजागृती व कारवाई मोहीम सुरू केली आहे.या मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष हेल्पलाइन मोबाईल नंबर 7887890100 सुरू करण्यात आला आहे.major campaign against drugs.

युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात नागरिक,विद्यार्थी आणि पालकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.अंमली पदार्थांची खरेदी,विक्री,साठा किंवा सेवनासंदर्भातील कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी 7887890100 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

या नंबरवर थेट कॉल करण्याबरोबरच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ पाठवूनही माहिती देता येणार आहे.माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव,पत्ता व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल,अशी स्पष्ट ग्वाही चंद्रपूर पोलीस प्रशासनाने दिली आहे.

                            "नागरिकांना आवाहन."

आपल्या परिसरात अंमली पदार्थांशी संबंधित कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास भीती न बाळगता पोलीस प्रशासनाला माहिती देऊन या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

#Chandrapur police launch major campaign against drugs. #Chandrapur Crime #Marathi News.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$