Gadchandur : चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)प्रभावी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेत गडचांदूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.दि.11 जुलै 2026 रोजी पोलीस मुख्यालय,चंद्रपूर येथे चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींची ओळख परेड आयोजित करण्यात आली होती.यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन गडचांदूर येथे दाखल अपराध क्र. 293/26,कलम 303(2)भारतीय न्याय संहिता(BNS) अंतर्गत गुन्ह्यातील संशयित सराईत आरोपीला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली.
चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव पोलीस ठाण्यात अन्य एका गुन्ह्यात जप्त असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला गडचांदूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
उघडकीस आलेल्या गुन्ह्यात पोलीस स्टेशन गडचांदूर येथील अपराध क्र.293/26,कलम 303(2) BNS अंतर्गत एकूण ₹ 1,79,960 किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद आहे.या प्रकरणातील आरोपीचे नाव दारासिंग हिरा बदखल (वय 35,रा. यात्रा वॉर्ड,वरोरा,ता.वरोरा,जि.चंद्रपूर),असे आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व गडचांदूर पोलीस पथकाने संयुक्तरीत्या केली आहे.
#Chandrapur District Crime News. #Gadchandur Police Action. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
