Action by LCB Chandrapur : एलसीबीची मोठी कारवाई!घरफोडीचा छडा; तीन आरोपी अटकेत, ₹1.32 लाखांचा मुद्देमाल जप्त|Marathi News.

News@Crime...

 Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा (LCB),चंद्रपूर पथकाने उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दीतील सातारा तुकूम येथील वन संरक्षण समितीच्या हॉलमध्ये झालेल्या घरफोडीचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे.या कारवाईत चोरीस गेलेला तसेच संशयित स्वरूपातील मिळून ₹1,32,800, किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. 05 ऑगस्ट 2026 रोजी उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार येथे अप.क्र.74/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS)कलम 305(ई),331(3) व 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सातारा तुकूम येथील वन संरक्षण समितीच्या हॉलचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी विविध साहित्याची चोरी केली होती.या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक आरोपी :

शेख नाजिम शेख हाफीज (वय 39)व्यवसाय,नसीब स्क्रॅप मर्चंट (भंगार दुकान),सध्या रा.चंद्रपूर.मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब उर्फ सक्सेना (वय 44),रा.घुटकाळा वॉर्ड,चंद्रपूर.पैयनप्पा उर्फ कुट्टी अण्णा रवी शेट्टी,रा.सावरकर चौक,चंद्रपूर.

जप्त मुद्देमाल :

HUSQVARNA कंपनीची पांढऱ्या व शेंदरी रंगाची आग विझविण्याची एअर मशीन (जुनी वापरलेली) ₹10,000, लोखंडी कुंपण तारचे एक बंडल (उंची 5 फूट,वजन 25 किलो)₹1,000, "वनसंरक्षण समिती, सातारा तुकूम" असे लिहिलेले स्टीलचे 35 ताट ₹3,500,मिरची कांडप मशीनचे 5 सुटे भाग ₹5,000.

गुन्ह्याव्यतिरिक्त संशयित स्वरूपात जप्त साहित्य :

नवीन अॅल्युमिनियम इलेक्ट्रिक तारचे 20 बंडल (वजन 257 किलो)₹25,700,"SARTHK HB 116 DEVELOPED UNDER RDSS" अशी नोंद असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक पोलचे 7 तुकडे(वजन 179 किलो)₹17,900,गंजलेल्या अवस्थेतील इलेक्ट्रिक पोलचे 6 तुकडे, त्यापैकी दोन तुकड्यांवर "13-410" व "13-370" असे क्रमांक अंकित (वजन 319 किलो) ₹31,900, रेल्वे विभागाच्या रुळ कापणीशी संबंधित लोखंडी साहित्य (लोखंडी कड्या व पट्ट्या)(वजन 378 किलो)₹37,800 असा एकूण ₹1,32,800 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.तीन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना व जप्त मुद्देमाल उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार यांच्या ताब्यात देण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात मूल स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने केली आहे.

#Action by LCB Chandrapur. #Crime News.

                            ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢