Gadchandur : NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी,UGC-NET परीक्षा रद्द,शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार तसेच भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या सहभागातून गुरुवारी(दि.23 जूलै)गडचांदूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.शालेय विद्यार्थी,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.मोर्चाची सांगता गडचांदूर पोलीस ठाण्यात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले.
निवेदनात देशातील शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी परीक्षा व भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी,UGC-NET परीक्षा रद्द होणे,तसेच शिक्षण व भरती प्रक्रियेबाबत समोर आलेल्या आरोपांमुळे विद्यार्थी,पालक आणि समाजात चिंता निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच संबंधित प्रकरणांची निष्पक्ष,पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,परीक्षा व भरती प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करावी,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
#Support for the protest at Jantar Mantar.#Gachandur.#Chandrapur.#Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$
