Commendable performance : चंद्रपूर पोलिसांची तत्परता अन् सतर्कता!|Marathi News.

News@Chandrapur District Police... 

                Chandrapur : जिल्हा पोलिसांच्या तत्पर,सतर्क आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले आहे.सावली पोलीस,भद्रावती पोलीस आणि चंद्रपूर सायबर पोलिसांनी अवघ्या 10 मिनिटांत संबंधित तरुणाचा शोध घेऊन त्याला सुरक्षित ताब्यात घेतले.त्यानंतर समुपदेशन करून त्याचे मनपरिवर्तन करण्यात आले आणि त्याला सुखरूप नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

      रविवार (28 जून 2026)रोजी पोलीस स्टेशन सावली हद्दीतील 32 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.दरम्यान,सकाळी सुमारे 11 वाजता त्या तरुणाने हातात विषारी रासायनिक द्रव्याची बाटली घेऊन नातेवाईकांना व्हिडिओ कॉल केला. "मी आत्महत्या करत आहे," असे सांगत त्याने कॉल अचानक बंद केल्याने नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.त्यांनी तात्काळ सावली पोलिसांशी संपर्क साधला.

        घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सावली पोलिसांनी त्वरित चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनची मदत घेतली.सायबर सेलने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित तरुणाचे लोकेशन शोधून तो भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न केले.ही माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत भद्रावती पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेऊन त्याला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले.पोलिसांच्या संवादामुळे त्याचे मनपरिवर्तन झाले आणि पुढील अनर्थ टळला.त्यानंतर त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.या संवेदनशील आणि जीवरक्षक कारवाईने तरुणाच्या नातेवाईकांनी चंद्रपूर पोलिसांचे मनापासून आभार मानत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले.

ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

  या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या नेतृत्वात सावली पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन मुसळे,पोहवा.संजय शुक्ला,पोअं.धिरज पिदुरकर,धनंजय काळे तसेच भद्रावती पोलीस स्टेशनचे सपोनि.विरेंद्र केदारे,संजय मिश्रा,पोउपनि संतोष केदार,पोहवा गोपाल आतकुलवार,पोअं.योगेश घाटोळे,भारत पुसांडे,खुशाल,किरण मिस्त्री आणि चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनचे सपोनि बलराम झाडोकर व पोअं.वैभव पत्तीवार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

#Chandrapur Police.#Commendable performance.

                        $$$$$$$$$$$$$$$$$$$$