Sant Shiromani Guru Ravidas Maharaj Jayanti; गडचांदूर भाजपतर्फे उत्साहात; ५१ दीप प्रज्वलित करून अभिवादन!| Marathi News.

News@Guru Ravidas Jayanti 2026...

         Gadchandur : संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, गडचांदूर शहराच्या वतीने भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच ५१ दीप प्रज्वलित करून त्यांच्या सामाजिक समता,मानवता आणि बंधुभावाच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

    कार्यक्रमाला गंगाधर खंडाळे,विक्की घोरे,समाधान पवार,धवल घोरे,भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे,तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,हरीश घोरे,महेश घरोटे,नगरसेवक हिमांशू नामवाड,नगरसेवक सुरज पांडे,रमेश चुदरी,गणपत बुरटकर,विकी उरकुडे,विठ्ठल धाडे,देविदास पेंदोर,भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,शहराध्यक्षा सौ.शितल धोटे, सौ.उमा कंटाळे,सौ.अपर्णा उपलेंचवार,सौ.सुंदरा दाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी उपस्थितांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांनी दिलेल्या समता,सामाजिक न्याय आणि मानवसेवेच्या विचारांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण होते.

#SantParampara #IndianCulture #Guru Ravidas Jayanti 2026 #Gadchandur BJP.

                           =¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢=

Advertisement....