Rajura : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या(ST)वतीने 1 ऑगस्टपासून महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य पात्र प्रवाशांसाठी एनसीएमसी (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या पुढाकारातून राजुरा आणि गडचांदूर येथे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
राजुरा येथील माता मंदिर आणि गडचांदूर येथील कन्यका माता मंदिर येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली.गडचांदूर येथे सुमारे 110 महिलांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी करून शिबिराचा लाभ घेतला,तर राजुरा येथेही शेकडो लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
शिबिरादरम्यान नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे महत्त्व, आवश्यक कागदपत्रे,नोंदणी प्रक्रिया तसेच कार्डच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना पुढील प्रक्रियेबाबत आवश्यक माहितीही देण्यात आली.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,शासनाच्या डिजिटल सेवांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा,महिला व ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण न येता त्यांना वेळेत स्मार्ट कार्ड उपलब्ध व्हावे,या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमासाठी संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्यासह मनोज कोल्हापुरे,सुनैना तांबेकर,रवी बुटले,अरुणा सालवटकर,किरण अहिरकर,सोनम येवले,सीमा वरारकर,संध्या वाघाडे,मनिषा काळे,श्रीरंग ढोबळे,शंकर बुऱ्हाण,अभय बोबाटे, किरण हेडाऊ,डॉ.चंद्रकांत कुईटे,सुनील रामटेके,स्वतंत्रकुमार शुक्ला,अरुणा बुटले,मेघा धोटे,बबीता कांबळे तसेच गडचांदूर व राजुरा येथील पदाधिकारी,सदस्य आणि संघटक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विशेष सहकार्य शालिक मधुकर भगत यांनी केले.
या शिबिरामुळे अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घरा जवळच एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली असून,या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहेत.
#National Common Mobility Card. #Chandrapue District News. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
