Cattle Smuggling : गडचांदूर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 12 गोवंशांची सुटका,7.40 लाखांचा मुद्देमाल जप्त!|Marathi News.

News@Crime...

Gadchandur : पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या 12 गोवंशांची सुटका केली असून,एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

       पोलिसांना 22 जून 2026 रोजी मुखबिराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की,गडचांदूर-आदिलाबाद मार्गावरून एका पिकअप वाहनाद्वारे गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जाणार आहे.या माहितीच्या आधारे तात्काळ गडचांदूर-कोरपना मार्गावरील मौजा आसन बसस्टॉप परिसरात नाकाबंदी करण्यात आली.दरम्यान MH/32/AJ/6471 क्रमांकाचे मॅक्स बोलेरो पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता,त्यामध्ये 12 जिवंत गाई आढळून आल्या.जनावरांना अत्यंत निर्दयतेने कोंबून कोणतीही चारापाणीची व्यवस्था न करता वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

        पोलिसांनी वाहनातील व्यक्तीकडे पशुवैद्यकीय प्रमाणपत्र, जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या पावत्या व इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.पुढील चौकशीत संबंधित जनावरे कत्तलीसाठी बाहेरगावी नेत असल्याची कबूली मिळाली.

         सदर कारवाईत 12 गाई(6 पांढऱ्या व 6 लाल रंगाच्या)प्रत्येकी अंदाजे 20 हजार रुपये किंमतीच्या,एकूण 2 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या जनावरांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मॅक्स बोलेरो पिकअप वाहन(अंदाजे किंमत 5 लाख रुपये),असा एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी संतोष रामाजी परचाके(वय 35,रा.कळंब हळदीपुरा, ता.जि.यवतमाळ)याला ताब्यात घेण्यात आले असून, फरार चालक पंकज बोटराव(रा.यवतमाळ),याचा शोध सुरू आहे.         सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सपोनि.सुखदेव गोदे,एनसीपी.बलवंत शर्मा,पोअं.सूरज, पोअं.प्रकाश व पोअं.साईनाथ यांनी केली आहे.प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

#Cattle Smuggling.#Action by Gadchandur Police.

                                $$$$$$$$$$$$$$$$$$$$$