Korpana : भारतीय जनता पक्षाच्या संघटन विस्ताराला आणखी बळ देत राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव (दादा)भोंगळे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते मोहब्बत खान, यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे यांनी त्यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून पक्षात स्वागत केले.पक्षप्रवेशानंतर भाजप कोरपना शहर कार्यकारिणीत अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर मोहब्बत खान यांची नियुक्ती करण्यात आली.याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र पक्षाच्या वतीने त्यांना प्रदान करण्यात आले.त्यांच्या संघटन कौशल्य,कार्यतत्परता आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मोहब्बत खान यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आमदार देवराव दादा भोंगळे यांनी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जाऊन पक्षाची विचारधारा प्रभावीपणे पोहोचवावी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे,असे आवाहन केले.
नियुक्तीनंतर मोहब्बत खान यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.अल्पसंख्यांक समाजामध्ये भाजपची विचारधारा पोहोचविणे,नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या नियुक्तीमुळे कोरपना शहरातील भाजपच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून,आगामी काळात पक्षाची ताकद आणखी वाढेल,असा विश्वास पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
#BJP News.#Mohabbat Khan,the City President of Korpana Minority Morcha.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
